राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा (3 मे) दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत आहे. मात्र, आता शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीकडून अचानकपणे ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई आणि सतेज पाटील हे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जाते. (Rajyasabha Election 2022)
राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल. त्यानुसार महाविकास आघाडीचे मंत्री शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जाते. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. मात्र, राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी आज दुपारपर्यंतची मुदत आहेत. त्यापूर्वी मविआ नेत्यांचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटणार का, हे पाहावे लागेल. तसेच देवेंद्र फडणवीस मविआच्या विनंतीला मान देऊन धनंजय महाडिक यांना माघार घ्यायला लावणार का, हेदेखील पाहावे लागणार आहे.