Devendra Fadnavis
Devendra FadnavisTeam Lokshahi

...असे निवडून येतील भाजपचे उमेदवार, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले सूत्र

'आम्हाला घोडे बाजार करायचा नाही, महाआघाडीने एक उमेदवार मागे घ्यावा'
Published on

राज्यात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. दरम्यान, आज राज्यसभेसाठी भाजपाच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) पुन्हा एकदा राज्य सभेवर जात असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis
Shivsena X BJP : राज्यसभा निवडणुकीत चुरस वाढणार, भाजपकडून तिघांचे अर्ज दाखल

मुबंईत माध्यमांना यासंदर्भात प्रतिक्रिया देत असताना फडणवीस म्हणाले, मंत्री पियुष गोयल पुन्हा एकदा राज्य सभेवर जात आहेत. ते सध्या केंद्रीय मंत्री आहेत आणि आता पुन्हा त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. भाजपाचे (BJP) अनिल बोंडे हे कृषिमंत्री राहिले आहेत. ते कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ असून पुन्हा एकदा राज्यातून निवडून जात आहेत. याशिवाय कोल्हापूरचे धनंजय महाडिक हे आमचे तिसरे उमेदवार असून आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भाजपाल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Nana Patole |काँग्रेसमध्ये नाराजी मांडण्याचा अधिकार, पण भाजपमध्ये...

तर दुसरीकडे आम्हाला घोडे बाजार करायचा नाही. कारण आमचे तीन उमेदवार रिंगणात असून ते निवडून येणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटातील महाविकास आघाडीने आपला एक उमेदवार मागे घ्यावा म्हणजे घोडेबाजारचा प्रश्न येणार नाही. तरीही त्यांनी उमेदवार निवडणूक रिंगणात ठेवला तरी आमचे तीनही उमेदवार विजयी होणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. आमचे तीनही उमेदवार सक्रिय राजकारणात असल्याने काही लोक सद्सदविवेक बुद्धीने आमच्या उमेदवारांना मतदान करणार आहेत. त्यामुळे आम्ही विचारपूर्वक फॉर्म भरला असल्याचेही ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com