नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 16 नोव्हेंबरला पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे उद्घाटन करणार आहेत. मात्र एक्स्प्रेस वेच्या होर्डिंग्जवर केवळ योगी आदित्यनाथ यांचेच चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा बनला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 16 नोव्हेंबरला पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे उद्घाटन करणार आहेत. तत्पुर्वी या एक्स्प्रेस वेच्या उद्घाटनाचे बॅनर सर्व ठिकाणी लावले गेले आहेत. मात्र एक्स्प्रेस वेच्या होर्डिंग्जवर केवळ योगी आदित्यनाथ यांचेच चित्र दिसत आहे. यूपीचा तथाकथित विकास त्यांच्यामुळेच झाल्याचा स्पष्ट संदेश या होर्डिंग्जद्वारे दिला असल्याची चर्चा आहे. तसेच केंद्र सरकारचे कोणतेही योगदान नसून सर्व श्रेय मला जाते, असे या होर्डिंग्जद्वारे स्पष्ट होत असल्याची चर्चा रंगली आहे.
पूर्वांचल एक्सप्रेसवे यूपी सरकारच्या उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे औद्योगिक प्राधिकरणाद्वारे बांधला जात आहे.पूर्वांचल हे योगींचे स्वतःचे क्षेत्र आहे त्यामुळे योगी इतर कोणालाही गौरव देऊ इच्छित नसल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे.
कसा आहे एक्सप्रेसवे ?
पूर्वांचल एक्सप्रेसवे यूपी सरकारच्या उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे औद्योगिक प्राधिकरणाद्वारे बांधला जात आहे. हा 341 किमीचा एक्सप्रेस वे यूपीमधील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे. अयोध्या, गोरखपूर, वाराणसीलाही लखनऊ ते गाझीपूर या एक्स्प्रेस वेने जाता येते. या एक्स्प्रेस वेचे बांधकाम आझमगडच्या राधाकिशन मंदिरा दरम्यान होते. योगींनी आपली हिंदू प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून उड्डाण पुलाच्या मध्यभागी मंदिराची रचना केली आहे. याचा प्रचारही जोरात सुरू आहे.