Covid-19 updates

चिंताजनक! राज्यात आज 17 हजार 864 नवीन कोरोनाबाधित रुग्ण

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. आज जवळपास 18 हजारानजीक नवीन कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला आहे.त्यामुळे राज्यशासनासह, आरोग्य यंत्रणेसाठी हि चिंतेची बाब ठरत चालली आहे. दरम्यान या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन कोणत्याही क्षणी कडक निर्बंध लावण्याची शक्यता आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 17 हजार 864 कोरोनाबाधित वाढले आहेत. तर, राज्यात आज रोजी एकूण 1 लाख 38 हजार 813 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज दिवसभरात राज्यात 87 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२६ टक्के एवढा झाला आहे

दरम्यान, आज 9 हजार 510 रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. त्यामुळे आतापर्यत एकूण 21 लाख 54 ह्जार 253 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 91.77 टक्के एवढे झाले आहे.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...