IPL 2022: आज आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore ) आणि पंजाब किंग्जशी (Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील हा तिसरा सामना असणार आहे.
विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर IPL मधील त्याचा हा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे चाहत्यांसह तज्ज्ञांच्या नजराही आता विराटच्या खेळीकडे लागून राहील्या आहेत. आता कर्णधारपदाच्या दडपणातून मुक्त झाल्यानंतर विराट उल्लेखनीय कामगिरी करेल असा अंदाज वर्तविला जात आहे.
बंगळुरुच्या संघाने IPL मधील सर्वोत्तम कामगिरी ही 2016 मध्ये केली होती. 2016 मध्ये बंगळुरुच्या संघाने उपविजेतेपदापर्यंत मजल मारली होती. 2016 च्या हंगामामध्ये विराटने 900 हून अधिक धावा करत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यानंतर IPL विराटच्या अश्याच कामगिरीची वाट चाहते पाहत आहेत. त्यामुळे यंदाच्या मोसमात विराटची बॅट कितपत चालणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे.
विराट यंदाच्या हंगामात त्याच्या मुळ खेळीसह खेळताना दिसणार की नाही हे तर सामना सुरू झाल्यानंतरच लक्षात येईल परंतू, जर विराट फॉर्ममध्ये आला तर त्या 'विराट' वादळात पंजाबचे किंग्ज कितपत तग धरू शकतील हे पाहणंही प्रेक्षकांसाठी रोमांचकारी ठरणार आहे.