कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता यातच ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. आता कुठे कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. सगळीकडची परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे.
मार्च महिन्यानंतरच राज्यात 100 टक्के अनलॉक केला जाणार असल्याची माहिती राज्याच्या टास्क फोर्सने दिली आहे.सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कमी झालेली नाही असंही टास्क फोर्सने स्पष्ट केलंय. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिलीय.
कोरोनाच्या अनुषंगाने राज्य सरकारने राज्यात लागू केलेले निर्बंध राज्य सरकार आता कमी करू शकतं असं पत्र केंद्रानेच राज्याला पाठवलं असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय.राज्यात लसीकरण बऱ्यापैकी झालं असून याचा परिणाम निर्बंध शिथिल करण्यावर होत आहे.त्यामुळे मार्च महिन्यात आणखी निर्बंध शिथिल केले जातील आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा अशीच मनीषा आहे असंही टोपे यांनी म्हटलंय.
आता राज्यात लॉकच राहिला नसून सध्या काही प्रमाणात असलेले हॉटेल व्यवसाय,लग्न,थियटर तसेच ईतर निर्बंध 100 टक्के परिस्थिती बघून हटवण्यात येतील अशी माहितीही टोपे यांनी दिलीय.