IPL चा १५ (IPL 15) वा हंगाम सुरू होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील पंडित (IPL Experts) आपापले अंदाज वर्तवत आहेत. तसेच विजेतेपदासाठी जाणाऱ्या संघा बाबतीत देखील अंदाज व्यक्त केले जात आहेत. अशातच भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी सुद्धा आपला अंदाज वर्तवला आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सकडे पाहता हा संघ विजेतेपदावर आपले नाव करू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन मोसमा पासून हा संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. २०२० साली हा संघ आयपीएल च्या फायनल मध्ये पोहोचला होता. त्यावेळी या संघाला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून हार पत्करावी लागली होती. तसेच मागच्या वर्षी २०२१ साली हा संघ प्ले ऑफ (Play Offs) मध्ये आला होता. गेल्या १४ सीझनमध्ये या संघाला एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही.
स्पोर्ट्स तकशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, "गेल्या मोसमात रिषभ पंतला कर्णधार म्हणून मिळालेला अनुभव हा त्याला या मोसमात खूप आत्मविश्वास देईल. गेल्या दीड महिन्यापासून भारतीय संघासाठी त्याने चांगला खेळ केला आहे, याचा त्याला आयपीएलमध्ये नक्कीच फायदा होईल." गावस्कर पुढे म्हणाले, "त्याने या मोसमात ज्या प्रकारच्या खेळाडूंची निवड केली आहे, ते खरोखरच मजबूत आहेत." त्यामुळे यंदा ते ट्रॉफी वर त्यांचं नाव कोरण्याची दाट शक्यता आहे.