लोकशाही न्यूज नेटवर्क | देना बँक आणि विजया बँकच्या ग्राहकांना 1 मार्चपासून नविन आयएएफसी कोड वापरावे लागणार आहे.बँकेच्या माहितीनुसार 28 फेब्रुवारीपासून देना बँक आणि विजया बँकेचे आयएएफसी कोड बंद होणार आहेत.जर तुमचे खाते या दोन बँकांमध्ये असेल तर लवकरात लवकर आपण बँकेकडून नविन आयएएफसी कोड घ्या.नविन कोड न घेतल्यास 1 मार्चपासून आपण कोणतेही ऑनलाईन व्यवहार करु शकत नाही.
आयएएफसी कोड म्हणजे काय?
● हा एक 11 अंकांचा एक कोड असतो.
● रिझर्व्ह बँकेकडून सर्व बँकांना हा कोड दिला जातो.
● या कोडचा इलेक्ट्रिक पेमेंटसाठी वापर केला जातो.
● याच्या सुरुवातीच्या चार अंकांवरुन बँकेचे नाव कळते. यात पाचवा अंक शून्य असतो. नंतरच्या 6 अंकांवरुन बँक शाखेचा कोड कळतो.