केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प असून गेल्यावर्षीसारखे यावर्षी देखिल निर्मला सीतारामन या टॅबच्या माध्यमातून अर्थसंकल्प मांडला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र या शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या घोषणांवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राकेश टिकैत म्हणाले की, MSP हमी कायदा होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही. MSP हमी कायदा झाल्यावर शेतकऱ्यांना लाभ मिळेल, यासोबतच ऊस कायद्यानुसार १४ दिवसांत पैसे न दिल्यास व्याज देण्याची तरतूद आहे. तरीही पैसे दिले जात नाही. गेल्या ५ वर्षांपासून उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार. पण भाजप सरकारनेही शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकवले. मार्च महिन्यापासून पैसे थकवले आहेत. सरकारने २३ पिकांना डिजिटलद्वारे जोडलं पाहिजे, असं टिकैत म्हणाले.
जेव्हा सरकारने एमएसपी हमी कायदा आणेल आणि तो लागू करेल. त्यावेळी कुठलाही व्यापारी रस्त्यात शेतमाल खरेदी करू शकणार नाही. शेतकऱ्यांची जी थकबाकी आहे, तिचेही डिजिटलायजेशन करून ती डिजिटली जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली.