Mumbai

‘बचपन के दिन भी क्या दिन थे; आशा भोसले यांची भावूक पोस्ट

Published by : Lokshahi News

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून लतादीदींना श्रद्धांजली वाहत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमींची गर्दी लोटली होती.

सोशल मिडियावर लतादीदींना अनेकजण श्रद्धांजली वाहत होते. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनादेखील ट्वीट करुन लतादीदींना अखेरचा निरोप दिला. आनंद महिद्रांनी ट्विटरच्या माध्यमातून लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी दिवंगत लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यासोबतच्या बालपणीच्या काही आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहिण. आशा भोसले यांनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत लिहिले की, ,"बचपन के दिन भी क्या दिन थे. दिदी और मै". आशा भोसले या उंच टेबलवर बसल्या आहेत तर लता दीदी त्या टेबलला धरून फोटोसाठी उभ्या दिसत आहेत.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का