पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका महत्वाच्या टप्प्यात असताना, खडदह विधानसभा मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 22 एप्रिलला कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं त्यांन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काजल सिन्हा यांची निधनानंतर ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे.
पश्चिम बंगालमधील वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं प्रचारसभांवर नियंत्रण आणलं आहे. राजकीय दलांकडून कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याबाबत मार्गदर्शक सूचनांचं पालन होत नसल्यानं आयोगानं चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 14 हजार 281 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.