गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप, यापैकी कोण बाजी मारणार, याचा फैसला होईल. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच या इर्षेने भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा या निवडणुकीत उतरवली होती. तर अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या ममता बॅनर्जी यादेखील चवताळून भाजपशी दोन हात करण्यासाठी ठामपणे उभ्या ठाकल्या होत्या. अशामध्ये भाजप 87, तृणमूल काँग्रेस 92 जागांवर आघाडीवर आहेत.
विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी 148 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे कोणता पक्ष बहुमताच्या या आकड्यापर्यंत पोहोचणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.