पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्यात मतदान सुरु झाल आहे. या मतदानासाठी १५,९४० मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. आतापर्यंत तीन टप्प्यांतील मतदान पार पडलंय.
पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात ४४ जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये मॅक्लिगंज, माथाभांगा, कूच बिहार (उत्तर), कूच बिहार (दक्षिण), सीतलकुची, सीताई अप्रिल, दिनहाटा अप्रिल, नटबरी, तूफानगंज, कुमारग्राम, कालचिनी, अलीपुरद्वार, फलकटा, मदारीहाट, सोनारपूर दक्षिण, भांगर, कस्बा, जाधवपूर, सोनारपूर उत्तर टॉलीगंज, बेहाला पुरबा, बेहला पश्चिम, महेशताला, बज बज, मटियाबुर्ज, १६९ बॅली, हावडा उत्तर, हावडा मध्य, शिबपूर, हावडा दक्षिण, संकरील, पंचला, उलूबेरिया पुरबा, दोम्जुर, उत्तरपारा अप्रिल, श्रीरामपूर, चांपदानी, सिंगूर, चंदननगर, चुंचुरा, बालागढ, पंडुआ, सप्तग्राम आणि चंदीताला या मतदारसंघांचा समावेश आहे.