आशिया चषकानंतर आता लगेचच पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात विश्वचषक टी 20 पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची नवीन जर्सी लॉच करण्यात आली आहे.
टीम इंडियाची नवीन जर्सी ही आधीच्या जर्सीपेक्षा वेगळी आहे. या नवीन जर्सीचे फोटो सोशल मीडियावर हे प्रचंड व्हायरल होत आहेत.
टीम इंडियाची जर्सी निळ्या रंगाची आहे.
टीम इंडियाच्या नवीन जर्सीवर तीन स्टार लावण्यात आले आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत तीन विश्वचषक जिंकले आहेत. त्यामुळे जर्सीवर तीन स्टार आहेत.
विश्वचषकासाठी तयार करण्यात आलेल्या खास जर्सीचे मुंबईमध्ये अनावरण झालंय.
टीम इंडियाच्या नवीन जर्सीवर बायजू आणि एमपीएल स्पोर्ट्सचे नाव लिहिले आहे. तसेच मध्यभागी भारत असे लिहिले आहे.
भारताने कपिल देवच्या नेतृत्वात पहिला विश्वचषक 1983 मध्ये जिंकला होता. तर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये पहिला T20 विश्वचषक जिंकला होता.
असा असणार टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.