दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने तयारी सुरु केली असून पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सवर उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा फोटो दिसत आहेत.
यावरुन तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री करण्यासाठी शिवसेनेनं दसरा मेळाव्याचा मुहुर्त काढला की काय?, अशा चर्चा सुरू आहेत.
तेजस ठाकरे हे ठाकरे कुटुंबातल्या चौथ्या पिढीतले आहेत. बाळासाहेबांप्रमाणेच तेजस ठाकरे यांना प्राण्याची आवड आहे.
तेजस ठाकरे हे पक्षाच्या व्यासपीठावर अधूनमधून दिसत असले तरी त्यांनी राजकारणापासून दूर राहणेच पसंत केले. बाळासाहेब ठाकरे यांनीच आपल्या एका भाषणात तेजस हा आपल्यासारखाच असल्याचे म्हटले होते.
आदित्य मवाळ आणि शांत आहे. परंतु तेजस आक्रमक असल्यामुळे त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न शिवसेना करु शकते.
तेजस ठाकरे यांना वाईल्ड लाईफमध्ये आवड असल्याने ते जंगलात नवीन प्रजातींवर संशोधन करत असताता.
यातीलच एक म्हणजे हिरण्यकश नदीत माशाची नवीन प्रजाती त्यांनी शोधून काढली होती. त्याला 'हिरण्यकेशी' नाव दिले.
सध्याची परिस्थिती पाहता शिवसेनेला तेजस ठाकरे तारतील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
परंतु, आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशांची चर्चा फेटाळली आहे.
तेजस वाईल्ड लाईफमध्ये व्यस्त आहे. आणि आम्ही आमच्या वाईल्डमध्ये बिझी आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.