प्रत्येकाच्या घरामध्ये टोमॅटो (tomato) असतोच. भाजी, आमटी, चटणी,टोमॅटो सूप (Tomato soup), यासाठीही टोमॅटोचा वापर केला जातो. एवढेचं नव्हे तर मांस, अंडी यामध्येही त्याचा वापर केला जातो. टोमॅटो हा स्वयंपाक घरातील एक महत्त्वाची फळ भाजी आहे. टोमॅटो हा खूप फायदेशीर आणि गुणकारीही आहे. टोमॅटोमध्ये व्हिटामिन (Vitamins) सी, ए, ई, के हे मुबलक प्रमाणात असतात.
अभिनेते ऋषी कपूर यांचा 'शर्माजी नमकीन' या हिंदी चित्रपटामध्ये एक गाणं आहे. 'सच की उम्र मेरी गरम है ये हाय, फिर से जवानी वाली याद दिलाये, केचप केचप सा चटख, मेरा लाल टोमॅटो.' हे गाण्याला खूप प्रसिद्धी मिळत आहे. या गाण्यामधून टोमॅटोचा वयाशी संबंध जोडला आहे. कारण टोमॅटोने पचनशक्ती सुधारते. आणि पोटासंबंधीतच्या सर्व समस्यासाठी ते गुणकारीही आहे.
टोमॅटोचा भाजी म्हणून जास्त वापर केला जातो. कारण तो एक आवश्यक घटक आहे. तसेच टोमॅटोचाशिवाय सॅलेडही (Salad) पुर्ण होत नाही. टोमॅटो हे सर्व हंगामामध्ये उपलब्ध असते. टोमॅटोच्या अनेक जाती आहेत. तसेच मुंबई, नाशिक आणि भारतात जयपुरिया टोमॅटो, चेरी टोमॅटोची आवकही मोठ्या प्रमाणात होत असते.
टोमॅटोची लागवड पेरूमध्ये (Peru) सुरू झाली. नंतर स्पेन, मेक्सिकोमधून ती पुढे जात राहिली. टोमॅटोला अमेरिकेत लव्ह ऍपल असेही म्हणत. तर काही देशांमध्ये टोमॅटोचा लाल रंग पाहून तो विषारी आहे असेही मानले जात होते.
टोमॅटोचा प्रवेश भारतामध्ये 16 व्या शतकात झाल्याचे मानले जात आहे. पोर्तुगीज आणि स्पॅनिश व्यापाऱ्यांनी त्याला आपल्या देशात आणलं. त्यावेळी भारतामध्ये याला 'विदेशी वांगी' असे म्हटलं जात असे. भारतात ब्रिटीश साम्राज्य आणि दुसऱ्या युद्धादरम्यान टोमॅटोची लागवड आणि त्याचा वापर खूप प्रमाणात जगभरात वाढला होता.