आज सकाळी ८ वाजल्यापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली येथील शाळेमध्ये मतमोजणी सुरु होती.
निवडणुकीसाठी 81 हजार मतदारांनी मतदान केले होते.
ऋतुजा लटकेंनी एकूण ६६ हजार २४७ मतं मिळवली. नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली आणि १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर राहिले.
अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती.
राज ठाकरे व शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक व शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. यानंतर भाजपने निवडणुकीतून माघार घेतली.
विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे, अशी भावना लटके यांनी व्यक्त केली आहे.
लटके यांच्यां विजयानंतर शिवसैनिकांमध्ये मोठा आनंद पाहायला मिळत आहे.