साक्षी जाधव
पावसाळ्यात शहापूर तालुक्यातील अनेक ठिकाणे निसर्गसौंदर्यांनी नटली असून कसाऱ्यातील विहीगावजवळ असणारा अशोका धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पुर्वी या धबधब्याल विहीगाव धबधबा असे होते.
2001 मध्ये रिलिज झालेल्या अशोका चित्रपटाचे शुटींग या ठिकाणी झाले होते. बॉलिवू़ड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या अशोका चित्रपटासाठी एक गाणे चित्रित झाले होते. तेव्हापासूनच हा धबधबा ‘अशोका धबधबा’ नावाने ओळखला जाऊ लागला.
कसे जावे?
मुंबईकडून नाशिकला येताना इगतपुरीच्या जरा अलीकडे कसारा घाटातील डाव्या बाजूच्या रस्त्याने जव्हार फाटा आहे, तिथून जवळपास सात किमी अंतरावर विहिगाव आणि अशोका धबधबा आहे. मुंबई-नाशिक महामार्गाने कसारा घाटाच्या आधी असलेल्या जव्हार फाट्यावरून विहिगावच्या या धबधब्यावर जाता येते.
प्रवासाची सोय
एसटी किंवा अन्य कुठलीही सार्वजनिक वाहतूक येथे जाण्यासाठी नाही. खाजगी वाहन हाच एकमेव पर्याय आहे. या ठिकाणाहून मुक्कामाची सोय नसली तरी मुंबई आणि नाशिक दोन्ही ठिकाणाहुन एका दिवसात सहज जावून परत येता येते. तसेच मध्य-रेल्वेच्या कसारा स्थानकावर उतरून जीप, रिक्षा किंवा एस.टी.ने या धबधब्यावर सहजच जाता येऊ शकते .
खाण्यासाठी काय मिळणार
जेवण्यासाठी हॉटेल्स वगैरेची सोय नाही मात्र विहिगावमधील काही आदिवासी कुटुंब शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या जेवणाची उत्तम सोय करतात. शिवाय मुंबई नाशिक हायवेलगतच्या हॉटेल्सचाही पर्याय आहे.
या ठिकाणची देखरेख ही वनविभागाकडून केली जाते व वनव्यवस्थापन कमिटीमार्फत पर्यटकांची काळजी घेतली जाते.
जेवणाची ऑर्डर दिल्यास चुलीवरचे शाकाहारी व मांसाहारी जेवणही उपलब्ध केले जाते.. परंतु आता जिल्हाधीकारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. त्यामूळे येथील पर्यटन तुर्त बंद आहे. ते केव्हा सुरु होणार त्याची खात्री करुन प्रवाशाचा बेत तयार करा.