हिंदुृहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
हा मार्ग १० जिल्ह्यांतील ३९२ गावांमधून धावेल.
यामुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करेल.
वन्यप्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांना जंगलाचे स्वरुप देण्यात आले आहे.
रस्त्याच्या कडेचा 11 लाख 50 हजार झाडे लावल्या जात आहे.
समृद्धी महामार्गाचे वैशिष्ट म्हणजे हा महामार्ग रात्री उजळून निघतो आणि तोही सौरऊर्जेने.
७१० किमी लांबीचा सुपर द्रुतगती मार्ग नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे मधून जाणार आहे.
समृद्धी महामार्गाला सहा बोगदे आहेत आणि त्यापैकी एक महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे. ‘न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड’ वापरून तयार करण्यात आलेला आहे.
शिर्डी ते मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा २०२३ च्या मध्यात खुला केला जाऊ शकतो.