BhauBeej 2023 
वेब स्टोरीज

BhauBeej 2023 : या भाऊबीजेला बहिणीला काय गिफ्ट द्यावं, असा प्रश्न पडला का? मग हे वाचाच

लाडक्या बहिणीला तुम्ही एकापेक्षा एक भारी गिफ्ट देऊ शकता. त्यातील निवडक गिफ्ट जाणून घ्या.

Published by : Team Lokshahi

दिवाळीचे पाचही दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. दिवाळीच्या पाचव्या दिवशी भाऊबीज असते. बहीण भावाच्या नात्याचे बंध जोपासणारा असा हा सण. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. हा दिवाळीतील भाऊ बहिणींचा साजरा केला जाणारा दिवस आहे.

या खास दिवशी बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्याला ओवाळते तर भाऊ बहिणीला आशीर्वाद आणि प्रेम म्हणून छान भेटवस्तू देतो. तुम्हालाही या वर्षी बहिणीला काय गिफ्ट द्यावं, असा प्रश्न पडला का? मग हे वाचाच.

बहिणीचं नातं भावासाठी नेहमीच मोठं आणि महत्त्वाचं असतं. त्यामुळे लाडक्या बहिणीला भेट देताना तिच्या आवडीनिवडीचा विचार करा. तिला अशी भेटवस्तू द्या जिच्यामुळे तिला आनंद होईल. शिवाय ती तिच्या उपयोगाचीपण असेल. तिला तुम्ही एकापेक्षा एक भारी गिफ्ट देऊ शकता. त्यातील निवडक गिफ्ट जाणून घ्या.

1. साडी (Saree)

साडी ही प्रत्येक स्त्रीसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे जर तुमची बहिण मोठी असेल अथवा विवाहित असेल तर तिला यंदा साडी नक्कीच द्या. तिला पारंपरिक डिझाईन्स आवडतात की मॉर्डन याचा नीट विचार करून त्या पॅटर्नची साडी द्या.

2. मेकअप किट (Makeup kit)

जर तुमच्या बहिणीला मेकअपची आवड असेल तर तुम्ही तिला मेकअप किट देऊ शकता. बहूदा मुलींना मेकअपची आवड असते. मेकअप किट देताना तिचा आवडता प्रोडक्ट किंवा ब्रँड कोणता, हे जाणून घ्या.

3. ट्रे्न्डी बॅग (Trendy Bag)

जर या रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट द्यावं हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर हे गिफ्ट तुमचा हा प्रश्न नक्कीच सोडवू शकेल. ही हाताने विणलेली शोल्डर बॅग तुमच्या बहीणीला नक्कीच आवडेल. ही बॅग कोणत्याही लुकवर तिला कॅरी करता येईल.

4. घड्याळ (Watch)

घड्याळाची आवड प्रत्येकीला असतेच. शिवाय तुमच्या बहीणीला जर निरनिराळ्या ट्रेंडची घड्याळ कलेक्शन करण्याची आवड असेल तर हे गिफ्ट तिला जरूर द्या. आजकाल गोल्ड, रोज गोल्ड, सिल्व्हर, गोल्ड आणि सिल्व्हर अशी विविध प्रकारची घड्याळं मिळतात. मात्र तुमची बहिण कॉलेजला जाणारी असेल तर नव्या ट्रेंडचं एखादं घड्याळ तिच्यासाठी निवडा ज्यामुळे तिला ते नक्कीच आवडेल.

5. सबस्क्रिप्शन (Subscription)

जर तुमची बहिण ओटीटी प्लॅटफॉर्मची फॅन असेल तर तुम्ही तिला कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

6. इअर फोन (Ear Phone)

संगीत हा अनेकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे तुमची बहिण देखील संगीतप्रेमी असेल तर हे गिफ्ट तिला नक्कीच आवडेल. हेडफोनचा वापर प्रत्येकाला होतच असतो. त्यामुळे या राखीपौर्णिमेला बहीणीला हे छानसं हेडफोन देण्यास काहीच हरकत नाही. शिवाय हे फार महागडं गिफ्ट नसल्यामुळे तुम्हाला परवडण्यासारखं आहे.

 7. कॉफी मग (Coffee Mug)

जर तुमच्या बहिणीला कॉफी पिण्याची आवड असेल तर तिला हे कॉफी मग देखील तुम्ही भेट देऊ शकता. जे तुमच्या बहिणीला नक्कीच आवडेल.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : मतमोजणीला सुरुवात; कोण उधळणार विजयाचा गुलाल?

Kolhapur District Assembly Constituency : पहिल्या कलामध्ये जिल्ह्यात महायुतीची आघाडी!

Election Commission | निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोंधळ, काँग्रेस आणि ठाकरे गटाचा कॉलमचं नाही

Ajit Pawar | Baramati | बारामतीत अजित पवार आघाडीवर, युगेंद्र पवार पिछाडीवर | Lokshahi News

आतापर्यंतच्या पोस्टल मतमोजणीत 'हे' नेते आघाडीवर