लोकशाही मराठीच्या नव्या कोरा शो लोकशाही पॉडकास्ट आजपासून सुरु झाला आहे.
या लोकशाही पॉडकास्टमध्ये ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी आदित्य ठाकरेंनी लोकशाहीच्या कार्यालयीन कामकाजाची माहिती घेतली.
तसेच, लोकशाहीच्या कर्मचाऱ्यांशी आदित्य ठाकरेंनी संवाद साधला.
आदित्य ठाकरेंनी लोकशाहीच्या कर्मचाऱ्यांसोबत फोटो काढले.
अनेकांनी सेल्फीही कॅमेऱ्यात कैद केले.
लोकशाही पॉडकास्टमध्ये आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना थेट आव्हान दिले आहे.
ठाण्यातून लढण्याची माझी 100 टक्के तयारी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.