भूपेश बारंगे | आज काळीज फाटल…त्यानं आकाश गाठलं….आविष्कार आमचा हिरा… अश्या शब्दातून या भावनिक पोस्ट आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या अधिकृत पेज फेसबुकवर पोस्ट टाकण्यात आली आहे.. ही भावनिक पोस्ट वाचताना डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागतात. एवढी भावनिक पोस्ट आज बापाच्या फेसबुकवर वाचायला मिळत असल्याने अनेकांनी याला प्रतिसाद देत त्यांच्या दुःखात सहभागी होत आहे. उराशी बाळगलेले डॉक्टर होण्याचं आई आणि बापाचं स्वप्न अर्धवट सोडून गेलय.आईचे स्वप्न होते मुलगा डॉक्टर व्हावं मात्र ते वरच्या कबूल नसल्याने होत्याच नव्हतं झाल अन डोक्यावर आकाश फाटल…
वर्ध्यात तुळजापूर वर्धा मार्गावरील सेलसुरा नजीकच्या पुलात 40फूट कार खाली कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. यात तिरोडा मतदारसंघाचेभाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलत्या मुलाचा समावेश होता.
पवन शक्ती या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इसापूर येथील एका हॉटेलमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला असल्याचे आता सीसीटीव्ही मध्ये उघडकीस आले आहे.रात्री उशिरा कारने परत येताना सेलसुरा नजीकच्या पुलाच्या सुरक्षा भिंतीला धडक देत कार उसळून पुलाचा खाली कोसळली आणि घटनास्थळी 7 वैद्यकीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या भीषण अपघातातील सातही वैद्यकीय विद्यार्थी सावंगीच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर पदवी घेत होते. यामध्ये भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता मुलगा आविष्कार रहांगडाले (वय 21),नीरज चव्हाण (वय 22),प्रत्युश सिंग (वय 23),शुभम जयस्वाल (वय 23),नितेश सिंग (वय 25),विवेक नंदन (वय 23), पवन शक्ती (वय 19) यांचा मृत्यू झाला. भावी डॉक्टरांचा अपघाती मृत्यू झाल्याने वर्धा जिल्ह्यासह देश्यात हळहळ व्यक्त होत आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त करत, नातेवाईकांना 2 लाखाची मदत जाहीर केली आहे.
आमदार विजय रहांगडाले यांची भावनिक पोस्ट
आज काळीज फाटलं,
त्यानं आकाश गाठलं;
अविष्कार आमचा हिरा,
होता आनंदाचा झरा;
डॉक्टर नव्हते खमारी गावात,
होती खंत आणि हुरहूर आमच्या मनात;
बापाचे स्वप्न पूर्ण करण्या,
गेला होता अविष्कार डॉक्टर बनण्या;
लागली कुणाची नजर,
आज दगडालाही फुटली पाझर;
गेला तरुण वयात सोडून,
केलेले सारे वादे तोडून;
तुझी आई आजही वाट पाही,
तिला तुझ्या डॉक्टर बनण्याची घाई;
कसे समझवू तिला,
तू परत येणार नाहीस मुला;
कुठे हरवलास पाखरा,
परत ये रे आमच्या लेकरा;
गेलास अविष्कार आम्हाला सोडून,
तुझ्यासाठी रंगविलेले सारे स्वप्न मोडून
आज आहे मातम सगळीकडे,
आई बाबा संगे सारा गाव ही रडे.