परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वॉक इन सुविधेद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार आहे. 18 ते 44 वयोगटातील परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कस्तुरबा, राजावाडी, कुपर रुग्णालयात लसीकरणाची वॉक इन सुविधा करण्यात आली आहे.
येत्या सोमवारपासून ऑन स्पॉट वॉक इन लसीकरण सुविधा सुरु करण्यात आल आहे. गेल्या दोन दिवसांपासून या विद्यार्थ्यांची लसीकरण केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने आज देखील राजावाडी रुग्णालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळत होती.