अयोध्येमध्ये २२ जानेवारीपासून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराचे उदघाटन होणार आहे. खरं तर प्रभू श्रीरामाच्या या सोहळ्याची सुरुवात सोशल मीडियापासून सुरू झाली आहे. सुरुवात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी कलागुणांचे प्रदर्शन करीत प्रभू श्रीराम यांना वंदन केले आहे.
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्पायडरमॅनसारखे कपडे घालून तबला वाजवताना दिसत आहे. त्याच्यामागे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचे एक चित्र दिसत आहे. या व्हिडीओमध्ये स्पायडरमॅनचे कपडे परिधान केलेला वादक 'हमारे साथ श्री रघुनाथ तो, किस बात की चिंता' भजन गात तबला वाजवत आहे. या तबला वादकाचे नाव अमन पाल आहे.
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. 'स्पायडरमॅन – वे टू अयोध्या' असे एका युजरने लिहिले आहे. तर 'सुपर हिरोला देखील महापुरुष कोण आहे हे माहित आहे', असे लिहित नमस्काराची इमोजी दिली आहे. तर एकाने 'कितीही शक्ती किंवा सुपरपॉवर असली तरीही रामभक्तीपलीकडे काहीही नाही', असे लिहिले आहे.