विधानसभा निवडणूक 2024

Zeeshan Siddique: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सात नव्या उमेदवारांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर झिशान सिद्दिकी प्रतिक्रिया म्हणलाले की,

Published by : Team Lokshahi

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सात नव्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर झिशान सिद्दिकी प्रतिक्रिया म्हणलाले की, माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा अतिशय भावूक क्षण आहे. मी अजित पावरांचे आणि प्रफुल्ल पटेलांचे यांचे धन्यवाद मानतो माझ्या या वाईट काळात माझ्यासोबत राहिल्याबद्दल. तसेच मला वांद्रे पुर्व येथून उमेदवारी मिळाली आहे आणि मला खात्री आहे मला तिथली सर्व लोक सपोर्ट करतील आणि मी वांद्रे पुर्व येथून जिंकून येणार.

"...तोपर्यंत फॉर्म भरु नका," बावनकुळे यांची उमेदवारांना तंबीसुरु

Bachhu Kadu: 4 नोव्हेंबरला मोठा बॉम्ब फोडणार, बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य

Fadnavis on Deshmukh: देशमुखांच्या 'डायरी ऑफ होम मिनिस्टर'वर देवेंद्र फडणवीस यांची टीका

'काका-पुतण्यांनी अडीच हजार कोटींचा घोटाळा केला', सुहास कांदे यांचा भुजबळांवर आरोप

Aditya Thackeray यांना वरळीत मिलिंद देवरा यांचं आव्हान