विधानसभा निवडणूक 2024

Yashomati Thakur : महाविकास आघाडीचे जर सरकार आलं तर सोयाबीनची 7 हजार रुपयांनी विक्री होणार

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • सोयाबीनला 7 हजारांचा दर देणार

  • '4 ते 5 दिवस राहिले सोयाबीन विकू नका'

  • यशोमती ठाकूर यांचं शेतकऱ्यांना आवाहन

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, काँग्रेस आणि काँग्रेससोबत असलेले जे पक्ष आहेत. महाविकास आघाडीने हा संयुक्त निर्णय घेतलेला आहे की, सोयाबीनला 7 हजारांचा भाव देणार.

आदरणीय खर्गे साहेबांनी, आदरणीय चेन्नीथला साहेबांनी याची घोषणा केलेली आहे. महाविकास आघाडीचे जर सरकार आलं तर सोयाबीन हा 7 हजार रुपयांनी विक्री होणार.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, माझं सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की सोयाबीन आता विकू नका, थोडेसं 4 - 5 दिवसच राहिलेलं आहेत. त्यामुळे थोडं थांबा. आपलं सरकार आलं तर आपण 7 हजार भाव नक्कीच देऊ. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Rohit Sharma Blessed with Boy: रोहितने दिली ज्युनियर हिटमॅनची खुश खबर, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली गोड माहिती...

शरद पवारांना भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, त्यानंतर जनसमुदायाचा एकच जल्लोष

Paithan Vilas Bhumare: पैठणमध्ये प्रचारादरम्यान विलास भुमरेंना भोवळ ; हाता-पायाला 3 ठिकाणी फॅक्चर

Sachin Dodke EXCLUSIVE | पायाभूत सोयीसुविधा देण्याचा सचिन दोडके यांचा संकल्प, विशेष मुलाखत

Latest Marathi News Updates live: कल्याण शिळफाटा रोडवर निवडणूक भरारी पथकाची कारवाई