विधानसभा निवडणूक 2024

मनसेचा महायुतीला उमेदवाराला पाठिंबा? पत्रक व्हायरल; राज ठाकरे काय म्हणाले?

वरळीत मनसेच्या नावाने फेक पत्रक व्हायरल; राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिलेला नाही.

Published by : shweta walge

एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. या 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर वरळी मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत असून यात मनसेकडून संदीप देशपांडे, शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि उद्धवसेनेकडून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. यातच वरळीत एक गंभीर प्रकार समोर आला आहे. वरळीत एक फेक मेसेज व्हायरल होत असल्याचं समोर आलं आहे. वरळीमध्ये मनसेने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, अशा प्रकारचे खोटं पत्रक वरळीमध्ये व्हायरल होत आहे.

वरळीत व्हायरल होणाऱ्या फेक पत्रकांत नेमका मेसेज काय?

प्रति, प्रिय वरळीकरांनो,

जय महाराष्ट्र आपण आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्यात पोहोचलो आहोत. आपणांस मी सांग इच्छितो की, शिवडी मतदारसंघात महायुतीने मनसे विरोधात उमेदवार न देऊन मनसेचा सन्मान केला आहे, आणि त्याचेच दायित्व म्हणून मनसेने ठरविले आहे की, हिंदूंच्या मतांचे विभाजन रोखण्यासाठी वरळीत धनुष्यबाणाला पाठिंबा देऊन शिवसेनेला समर्थन देणार आहे. आपल्या मतांचा सन्मान करा आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान द्या... येत्या २० नोव्हेंबरला प्रत्येकाला घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आपले प्रत्येक मत अनमोल आहे, असं फेक पत्रक राज ठाकरेंच्या नावाखाली व्हायरल करण्यात येत आहे.

यावरच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी आता पाहिलं ते पत्र. त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल. ज्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचं सोडाच पण मतं मिळण्याचा तेच असल्या काहीतरी गोष्टी करत असतात. याने काही फायदा होणार नाही. वरळीकर सुज्ञ आहेत. अशाप्रकारचा कोणताही पाठिंबा शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाही आहे. आम्ही आमची निवडणूक लढवत आहे. मतदारांनी देखील यावर विश्वास ठेऊ नये. ही गोष्ट खोटी आहे.

परळी मतदार संघात 122 मतदान केंद्रांवर फेर मतदान होणार?

Reshma Shinde Kelvan: तिच्या माणसांनी केलं तिच केळवण, रेश्माचं थाटामाटत उरकल केळवण

अदानी समूहानं जारी केलं अमेरिकेतील आरोपांवर निवेदन

Latest Marathi News Updates live: मतदानात महिलांची टक्केवारी वाढली

CBSE Board Exam 2025: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर