विधानसभा निवडणूक 2024

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान

मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • महाराष्ट्र विधानसभेसाठी उद्या मतदान

  • मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक

  • मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे.

मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असून मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील 9.70 कोटींहून अधिक मतदारांसाठी 1 लाख मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

उद्या 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत एकाच टप्प्यात होणार असून मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. उद्या मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा:

विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप, बविआ आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले, विरारमध्ये राडा

Latest Marathi News Updates live: विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप

रायगड जिल्ह्यात निवडणुकीची जय्यत तयारी; मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त

BJP Vs Congress | चंद्रपूरच्या कोसंबीत भाजप - काँग्रेसमध्ये मोठा राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकल्या

बारामतीत नाट्यमय घडामोडी! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या कंपनीवर रात्री सर्च ऑपरेशन