विधानसभा निवडणूक 2024

Vote Jihad: "धर्माचा वापर करून मविआचे प्रमुख नेते वोट जिहाद करत आहेत”, फडणवीस यांची टीका

नोमानी म्हणत आहेत वोट जिहाद करा असं फडणवीस म्हणत आहे. अल्पसंख्यांक मत मिळवण्यासाठी मविआच हे काम आहे असा फडणवीसांचा आरोप आहे.

Published by : Team Lokshahi

नोमानी म्हणत आहेत वोट जिहाद करा असं फडणवीस म्हणत आहे. अल्पसंख्यांक मत मिळवण्यासाठी मविआच हे काम आहे असा फडणवीसांचा आरोप आहे. वोट जिहाद विराधोत एकत्रित व्हाव लागेल असं देखील फडणवीसांच म्हणं आहे. कसलं वोट जिहाद कोणाला वोट द्यायचं हो त्यांचा प्रश्न आहे असा पलटवार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावर केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते सज्जात नोमानी सांगतात अपिल करतात आणि सांगतात वोट जिहाद करा आणि त्याचसोबत असं देखील सांगतात आमच्या बोट जिहादचे आलासिपासलार हे शरद पवार आहेत आणि आमचे सिपासलार हे उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत, राहूल गांधी आहेत. निवडणुकीमध्ये इतक लांगुलचालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही पाहिलेलं नव्हतं. हे केवळ अल्पसंख्यांक मत मिळवण्याकरता अशाप्रकारे विरोधीपक्ष मविआ याठिकाणी काम करत असेल तर त्यांच्या विरोधात आपल्या सगळ्यांना एक व्हावचं लागेल.

तर यावर प्रत्युत्तर म्हणून संजय राउत म्हणाले की, कसला वोट जिहाद? तुम्हाला मत मिळत नाहीत एखाद्या जातीचे, एखाद्या पंताचे, एखाद्या धर्माचे, एखाद्या समाजाचे हा त्यांचा प्रश्न आहे कोणी कोणाला मत द्यायचा. 2014 च्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने मोदींना मत दिलं, मग तो वोट जिहाद समजायचा का? यांचा जो मानसिक गोंधळ आहे त्याच्याबद्दल आम्हाला चिंता वाटते आहे.

तर नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना माझा एक सल्ला आहे की, महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आणि हिंदू हा वाद करु नका तुमच्या अडीच वर्षात आणि तुमच्या 2014 ते 2019 च्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केल ते सांगा?

Sham Saner Shindkheda Assembly constituency: शाम सनेर यांची शिंदखेडा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी, महायुती व महाविकास आघाडीचे आव्हान

वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवाराला काळं फासलं

Kalyan Uddhav Thackrey On Ajit Pawar: अजितदादांना आशिर्वाद अखंड उपमुख्यमंत्री भव; ठाकरेंचा दादांना टोला

'व्होट जिहाद'वरून शरद पवारांंचे फडणवीसांसह भाजपला जोरदार प्रत्युत्तर

Latest Marathi News Updates live: मला सोडून गेलेले पुन्हा कधी निवडून येत नाहीत; शरद पवार