विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि विनोद तावडे यांच्यात यावेळी बाचाबाची झाली. हितेंद्र ठाकूर यांच्याकडून विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळेच, विरारच्या हॉटेलमध्ये वातावरण तापलं आहे. दरम्यान, विनोद तावडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये राडा झाला आहे.
हिंतेद्र ठाकूर यांच्याकडून मोठा खुलासा
तर हिंतेद्र ठाकूर म्हणाले होते की, त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ही माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी या गोष्टीचा खुलासा केल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांना विनोद तावडेकडून फोनकॉल करण्यात आले होते. हे प्रकरण थांबवण्यासाठी आणि याबद्दल चौकशी थांबवण्यासाठी विनोद तावडेंनी हितेंद्र ठाकूर यांना फोनकॉल केला होता.
बविआच्या आरोपावर विनोद तावडे म्हणाले,
त्याचपार्श्वभूमीवर आता विनोद तावडे प्रतिक्रिया देत म्हणाले, निवडणूका आहेत तर पोलिस तपासणी करो, त्यांच्याकडून तपासणी होऊ देत, नाही तर सीसीटीव्ही फुटेज घेऊ देत. त्याच्यात वास्तव जे आहे... मी तर 40 वर्षांपासून पार्टीमध्ये आहे. अप्पा ठाकूर मला ओळखतात, क्षितिज ठाकूर मला ओळखतात सगळे मला ओळखतात. तर त्यामुळे जी वास्तविकता आहे ती सगळ्यांना माहित आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष तपासणी केली पाहिजे असं माझ मत आहे.
नालासोपऱ्यातील घडनेवरून विनोद तावडेंकडून वक्तव्य
आज नालासोपाऱ्यामध्ये वाड्यावरून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे दिवस नियम काय आहेत. ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आमच्या समोरच्या मित्र पक्षांचा असा समज झाला की मी पैसे वाटले. मग मी म्हटलं की सगळ तपासा काहीचं हरकत नाही. मग अप्पा ठाकूर आले, हिंतेद्र ठाकूर आले, क्षितिज ठाकूर आले त्यांच्यामध्ये चर्चा सुरु झाल्या. जर पैसे वाटप होत असतील तर त्याची चौकशी निवडणूक आयोग, पोसिल आयोग सीसीटीव्ही फुटेज सगळ आहे. पण निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी मत यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची... ऑब्जेक्शन घ्यायचा तर कसा घ्यायचा. अशा गोष्टी करण्यासाठी त्या बैठकीमध्ये पोहचलो.