विधानसभा निवडणूक 2024

Vidhansabha Election Amit thackeray Uddhav thackeray: शिंदे गटाला आता तगडं आव्हान! अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा?

Published by : Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांची जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावांची यादी हळू हळू समोर येत आहे. विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे आणि अशातच वेगवेगळ्या पक्षात अनेक हालचाली पाहायला मिळत आहेत.गेले काही दिवस मविआमध्ये इनकमिंगला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे.

तर त्यामुळे महायुती आणि शिंदे गट तसेच इतर पक्ष यांना तगडं आवाहन समोर येत आहे. अशातच आता अमित ठाकरे दादर माहिम मंतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. अमित ठाकरे यांच्या दादर माहीम मतदारसंघाच्या उमेदवारीबद्दल निश्चिती असल्याची माहिती मिळत आहे. अशातच एका मोठ्या चर्चेला उधान आलं आहे ती म्हणजे, जर अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरतील तर अमित ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असेल असं सुत्रांकडून समोर आलं आहे, तसेच आदित्य ठाकरेंविरोधात मनसे उमेदवार देणार नाही? अशा हालचाली सुरू आहे.

या आधी भांडुप, मागठाणे आणि माहिम या तीन मतदारसंघांची निवड अमित ठाकरे यांच्यासाठी करण्यात आली होती. अमित ठाकरे आधी वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या आणि त्यानुसार त्यांच्या समोर आदित्य ठाकरे हे पाहायला मिळणार होते. मात्र आता अमित ठाकरे दादर माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांना तगडं आवाहन पाहायला मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरे, पवारांसह काँग्रेसचाही नायनाट झालेला दिसेल : रामदास कदम

'जरांगेंची निवडणूक लढवण्याची पात्रता नाही' ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Gift ideas for Diwali : दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या 'हे' गिफ्ट्स

Diwali 2024: दिवाळीमध्ये उटणे लावण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

'आभाळमाया', 'वादळवाट' च्या शीर्षकगीतांचा जादूगार हरपला, गीतकार आणि पटकथाकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन