विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता 'चक्रीका' अॅप मतदान केंद्रांवर लक्ष ठेवणार आहे. निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना चक्रिका अॅप डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हा 'चक्रीका' अॅप 19 आणि 20 नोव्हेंबरला सुरू ठेवणे कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आले असून या अॅपमुळे मतदान केंद्रात गोंधळ झाल्यास ते प्रशासनाला तातडीने समजणार असून चक्रिका अॅपमुळे कर्मचाऱ्यांचे गुगल लोकेशनही निवडणूक आयोगाला समजणार असल्याची माहिती मिळत आहे. या अॅपच्या मदतीने निवडणूक केंद्रात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीची माहिती प्रशासनाला तत्काळ देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा: