प्रातिनिधीक फोटो 
विदर्भ

अमरावतीत इव्हीएमच पळवले? पाहा नेमकं काय घडलं?

अमरावतीमध्ये चक्क काही अज्ञातांनी ईव्हीएम मशिन्स पळवले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं चात आहे. अमरावतीतील बडनेरा मतदारसंघातील गोपालनगरमध्ये हा प्रकार घडला.

Published by : Team Lokshahi

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. आता संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागलं आहे. मात्र, मतदान प्रक्रिया पार पडण्यापूर्वी घडलेल्या गैरप्रकारावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. दिग्गजांचे भवितव्य मतपेटीमध्ये कैद झाली आहेत. तर अमरावतीमध्ये चक्क काही अज्ञातांनी ईव्हीएम मशिन्स पळवले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं चात आहे. अमरावतीतील बडनेरा मतदारसंघातील गोपालनगरमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर काही काळ तेथे तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.

थोडक्यात

  • अमरावतीत मतदान केंद्रांवरून दुचाकीने इव्हीएम पळविल्याचा आरोप

  • राजकीय कार्यकर्ते आक्रमक

  • अमरावती शहरातील गोपालनगर मधील प्रकार

  • इव्हीएममध्ये घोळ केल्याचा ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवार प्रिती बंड यांचा आरोप

  • सगळ्या मशीन सुरक्षित असल्याची प्रशासनाची लोकशाही मराठीला माहिती

बडनेरा विधानसभा मतदार संघातील अमरावती शहरातील गोपालनगरस्थित राजीव गांधी उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांवरून मतदान आटोपल्यानंतर अज्ञातांनी दुचाकीहून चार इव्हीएम पळवून नेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तुषार भारतीय व प्रीति बंड यांच्यासह हजारो कार्यकर्ते दाखल झाल्याने या ठिकाणी गोंधळ होऊन राडा झाला होता. काही स्थानिकांना अज्ञात व्यक्ती इव्हीएम दुचाकीहून आणि उचलून घेऊन जात असल्याचे दिसले. त्यानंतर तणाव निर्माण झाला. तर या ठिकाणी मतपेट्यांमध्ये घोळ झाला. स्थानिक आमदाराच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी केली असा आरोप ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवार प्रिती बंड यांनी केला आहे.

बडनेरा येथील दुचाकीवर ईव्हीएम नेण्याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मतदान केंद्रावरील सर्व ईव्हीएम निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुरक्षित आहेत. याबाबत नागरिकांमध्ये झालेल्या संभ्रमाबाबत स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रावर पोहचत आहे. ईव्हीएमबाबत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती प्रशासनाने दिली. त्यानंतर रात्री उशीरा प्रकरण शांत झाले.

Latest Marathi News Updates live: राजकीय पक्षांची हॉटेलवारी होण्याची शक्यता

मुंबईसह उपनगरांत किमान तापमानात घट

'नाद करा.. पण आमचा कुठं?'; सिंधुदुर्गात निकालाआधीच निलेश राणे यांचे विजयी बॅनर

विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल; स्ट्राँग रूमवर सीसीटीव्हीने लक्ष ठेवण्यात येणार

निवडणूक निकालाआधीच राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग