preparation for election Team Lokshahi
विदर्भ

निवडणुकीच्या तोंडावर भंडाऱ्यात 27 गुंडावर तडीपारीची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भंडारा जिल्ह्यातून तब्बल 27 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. भंडारा तुमसर आणि साकोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी या कारवाईसंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

Published by : Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भंडारा जिल्ह्यातून तब्बल 27 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. भंडारा तुमसर आणि साकोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी या कारवाईसंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

भंडारा, तुमसर आणि साकोली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून बडगा उभारला आहे. भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी यापूर्वीच गुन्हेगारांच्या याद्या तयार करून ठेवण्यास सर्व पोलिस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमधून आलेले गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आले. त्यानंतर संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रभावाने हे तडीपारीचे आदेश काढले आहेत.तडीपारीचे आदेश निघालेल्यांमध्ये एकूण 27 गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यात भंडारा उपविभागात सर्वाधिक 16 गुन्हेगार आहेत त्या खालोखाल तुमसरमधील 9 आणि साकोलीतील 2 गुन्हेगारांचा समावेश आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी