111 years old grany voted in gadchiroli 
विदर्भ

गडचिरोलीत १११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान

गडचिरोलीत १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. फुलमती बिनोद सरकार असं या १११ वर्षांच्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत.

Published by : Team Lokshahi

गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले.

गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. फुलमती बिनोद सरकार असं या १११ वर्षांच्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. आजींना चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हील चेअरची व्यवस्था केली होती. आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांचा उत्साह वाढवला. आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. तर मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी १११ वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्श आहेत. एवढेच नव्हे, तर तिने आपल्या बांगला भाषेत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले हे विशेष.

थोडक्यात

  • गडचिरोलीमध्ये मतदानाचा टक्का अधिक

  • गडचिरोलीत १११ वर्षाच्या आजीने केलं उत्साहात मतदान

  • मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी १११ वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्श

१११ वर्षाच्या आजी नेमक्या आहेत तरी कोण?

फुलमती बिनोद सरकार (वय १११) असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला. आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हील चेअरची व्यवस्था केली होती.आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. तर मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी १११ वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता.

Latest Marathi News Updates live: महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत बैठकांचा सिलसिला

Sanjay Raut : काही अपक्ष आमदारांनी आम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा व्यक्त केली

विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी वंचित बहुजन आघाडीचं ट्विट; संजय राऊत म्हणाले...

विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी वंचित बहुजन आघाडीचं ट्विट

उद्धव ठाकरे यांचा नाना पटोले यांना फोन; कारण काय?