विधानसभा निवडणुकीच्या उद्या निकाल लागणार आहे. या निकालाआधी वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत म्हटले आहे की, जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ.आम्ही सत्ता निवडू ! आम्ही सत्तेत राहायला निवडू !
याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे लोकशाही माननारे नेते आहेत. त्यांचे जर 50 - 60 आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली 50 - 60 आमदारांची तर आम्ही नक्की आणि प्रकाश आंबेडकर साहेब महाराष्ट्राचे महत्वाचे नेते आहेत. आम्ही नक्की त्यांचा विचार करु.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, लोकसभेलासुद्धा आम्ही प्रयत्न केला ते आमच्याबरोबर राहावेत. विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा विचार केला. त्यांचे म्हणणे आहे ज्यांनी सत्ता येणार त्यांच्याबरोबर राहणार, आमची सत्ता येत आहे. त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्याबरोबर नक्की राहतील. असे संजय राऊत म्हणाले.