उ. महाराष्ट्र

नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजयकुमार गावित यांना भाजपकडून सातव्यांदा उमेदवारी; म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून डॉ.विजयकुमार गावित यांना भाजपकडून सातव्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत डॉ.विजयकुमार गावित म्हणाले की, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डा साहेब व निवड समितीने जी माझी निवड केली. नंदुरबार विधानसभा मतदारसंघासाठी त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, नंदुरबार विधानसभेची उमेदवारी देऊन नंदुरबार मतदारसंघाची सेवा करण्याची जी संधी उपलब्ध करुन दिली. त्या संधीचा उपयोग लोकांच्या सेवेसाठी निश्चितपणाने करेन आणि पक्षाची मान उंचवण्यासाठी व पक्ष संघटनेसाठी जे जे करावे लागेल ते निश्चितपणाने मी पूर्ण करेन. असे डॉ.विजयकुमार गावित म्हणाले.

बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार; बच्चू कडू म्हणाले...

वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एनसी? भाजपच्या शायना एन सी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता

महायुती मनसेला बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता; शिंदे, फडणवीस, राज ठाकरेंमध्ये पाठिंब्याबाबत चर्चा?

काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता; 54 उमेदवारांची नावं निश्चित?

भाजपनंतर आज शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता; 50 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार?