उद्धव ठाकरे यांनी काल भाषणादरम्यान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रणितीलासुद्धा मी सांगणार आहे की तुसुद्धा या प्रचारात उतरली पाहिजेस.
कारण मी स्वत: प्रणिती ताईच्या प्रचारासाठी आलो होतो. सुशीलकुमारची घरी आले होते. त्यांनी मला विनंती केली आणि सुशीलकुमारजी म्हणजे आपल्या शिवसेनाप्रमुखांचे जुने मित्र. आपल्या उमेदवाराच्या 2 - 3 सभा सोडून मी प्रणितीताईसाठी आलो होतो.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आता प्रणितीताईलासुद्धा मी सांगतो आहे की, प्रणितीताई तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत केली आहे. आता तू यांच्यासाठी मेहनत कर. कारण जर का आपल्याला आघाडी म्हणून नातं टिकवायचं असेल आणि भाजप आणि त्यांच्या युतीला आपल्याला हद्दपार करायचं असेल तर आता ही एकजूट जी झालेली आहे त्या एकजूटमध्ये कुठेही आता तूट असता कामा नये. असे उद्धव ठाकरे म्हणाले.