विधानसभा निवडणूक 2024

Uddhav Thackeray : शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; २० जणांना 'मातोश्री'वर बोलवून मोठा निर्णय

उद्धव ठाकरे यांची शिवसेनेतील बंडानंतर खबरदारी; २० नवनिर्वाचित आमदारांना मातोश्रीवर बोलावून शपथपत्र लिहून घेणार

Published by : shweta walge

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पाणीपतं झाल्याचं पाहायला मिळाल. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला, कारण ९५ जागा लढवूनही ठाकरे गटाला अवघ्या वीसच जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी पक्षाच्या नवनिर्वाचित २० आमदारांची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रत्येक आमदाराकडून शपथपत्र लिहून घेतलं जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटातील काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरेंकडून विशेष खबरदारी घेण्यात आली असल्याच सांगितलं जात आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना पक्षफुटीचा अनुभव आहे. दरम्यानच्या काळातही अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे.

ठाकरे गट नवनिर्वाचित २० आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार आहे. पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम राहणार असून सर्व आमदार या निर्णयाशी बांधील असतील, असं यात नमूद केलं जाणार आहे.

शिवसेना गटनेतेपदी कोण?

कोकणातील शिवसेनेचे नेते भास्कर जाधव, आदित्य ठाकरे सुनील प्रभू या नेत्यांचा विचार प्रपोज आणि गटनेते पदासाठी केला जाणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. शिवसेनेच्या आजच्य बैठकीत विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालासंदर्भात सुद्धा चर्चा या नव्या आमदारांसोबत आणि ठाकरे गटांच्या नेत्यांसोबत केली जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. राज्यात भाजप महायुतील तब्बल 236 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं. त्यापैकी भाजपने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर, शिवसेना शिंदे गटानेही तब्बल 57 जागांवर विजय मिळवला. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीचं पाणीपतं झाल्याचं पाहायला मिळाल. शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्याचं दिसून येत आहे. सत्तास्थापनेपूर्वीच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली असून आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतले जाणार असल्याची माहिती आहे.

IPL Mega Auction 2025 Live: मुंबई पलटनचा शेफर्ड आता आरसीबीसाठी खेळणार

शरद पवार आणि अजितदादा कधीही एकत्र येतील; अजितदादांच्या जवळच्या नेत्याचं विधान

Laxman Hake OBC : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून मंत्रिपदाची मागणी

Mumbai Indians IPL Mega Auction 2025 : "या" 18 वर्षीय खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सचा हट्ट कायम, कोण आहे हा खेळाडू?

गोपाळ शेट्टींना बोरिवली पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण काय?