थोडक्यात
मी घर फोडण्याची काम कधीच केली नाही.
कोविड काळात महाराष्ट्राची सर्वात चांगली कामगिरी.
शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित करणारे सरकार आहे तरी कुठे?
मी घर फोडण्याची काम कधीच केली नाही. सत्ताधारी घरफोडे आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तर कोविड काळात महाराष्ट्राची सर्वात चांगली कामगिरी झाल्याचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला आहे. मी घरी बसून जनतेची घरं सांभाळली तर शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित करणारे सरकार आहे तरी कुठे असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला आहे.
यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे म्हणाले की, हे जे आता बाजारगोडगे फिरत आहेत ना हे म्हणत होते की, घरी बसून होते. मी घरी बसून होतो पण मी माझ्या जनतेची घर सांभाळली. जी घर तुम्ही वनवनकरून फोडता आहात ती घर फोडण्याचं पाप मी केलं नाही आणि आयुष्यात कधी करणार सुद्धा नाही. आमच्या काळात जो सोयाबीनला भाव होता तो 10 हजार इतका होता आणि आता 50 हजार इतका आहे.
त्यांना तर खोके मिळाले आणि तुम्हाला भाव पण नाही. आमच्या काळात जो 10 हजार भाव होता तो आज तीन साडे तीन हजारावर गेलेलं आहे. कापसाची खरेदी तर अजून सुरुच नाही झाली आहे. डाळीचे भाव पडले आहेत. मग सरकार आहे कुठे? सरकार आपले दानी काय करत आहेत, आले की घाला लाथ त्यांच्या, कसले दारोदारी फिरत आहात.