विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीने 46 जागांवर विजय मिळवला. यामध्ये महायुतीत भाजपला 132 जागा, शिवसेना शिंदे गटाला 57 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 16 जागा, ठाकरे गटाला 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 21 महिला आमदार निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या 4, शिवसेनेच्या 2, तर भाजपच्या 14 आमदार निवडून आल्या आहेत. यासोबतच विधानसभेत काँग्रेसच्या 1 आमदार निवडून आल्याचे पाहायला मिळत आहे. या 21 महिला विधानसभेत जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजप
श्वेता महाले, भाजप
मेघना बोर्डीकर, भाजप
देवयानी फरांदे, भाजप
सीमा हिरे, भाजप
मंदा म्हात्रे, भाजप
मनीषा चौधरी, भाजप
विद्या ठाकूर, भाजप
माधुरी मिसाळ, भाजप
मोनिका राजळे, भाजप
नमिता मुंदडा, भाजप
श्रीजया चव्हाण, भाजप
सुलभा गायकवाड, भाजप
स्नेहा पंडित, भाजप
अनुराधा चव्हाण, भाजप
शिवसेना
मंजुळा गावित, शिवसेना
संजना जाधव, शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस
सरोज अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेस
सना मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
अदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
ज्योती गायकवाड, काँग्रेस