विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता महायुती मनसेला बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील काही जागांवर महायुती बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे, फडणवीस, राज ठाकरेंमध्ये पाठिंब्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री चर्चा झाल्याचे बोलले जात असून शिवडी, वरळी, माहीमसह काही मतदारसंघांबाबत चर्चा झाली असून आता महायुती मनसेला बिनशर्त पाठिंबा देणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.