विधानसभा निवडणूक 2024

मनसेची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कोणाला संधी मिळणार?

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मनसेची पहिली यादी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळत असून यामध्ये अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचं तसेच संदीप देशपांडे, स्नेहल जाधव यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.

यातच काल सोमवारी राज ठाकरे यांच्याकडून राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता मनसेच्या पहिल्या यादीच कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

जुन्नरमधून अतुल बेनके यांची उमेदवारी निश्चित, 'या' दिवशी भरणार अर्ज

दिंडोरी विधानसभेत महायुतीत बंडखोरीची शक्यता; शिवसेनेचे धनराज महाले निवडणूक लढण्यावर ठाम

जुन्नरमधून अतुल बेनके यांची उमेदवारी निश्चित, 'या' दिवशी भरणार अर्ज

Pune : पुण्यात खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड

Hingoli : हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात भूकंपाचे सौम्य धक्के