विधानसभा निवडणूक 2024

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी 'या' दिवशी जाहीर होणार

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी 19 ऑक्‍टोबरला जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची लगबग पाहायला मिळतेय. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरु झाले आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्वाचे आहेत. यासोबतच अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्या मोदी बागेत जाऊन भेट देखील घेतली आहे.

त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना शरद पवार यांनी त्यांच्या नेत्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिल्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. यामध्ये कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

SSC - HSC Exam Time table : दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रकाबाबत राज्य मंडळाने दिली 'ही' महत्वाची माहिती

नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाचं थैमान; कांदा पिकाला मोठा फटका

महायुतीच्या जागा वाटपाबाबत गिरीश महाजन म्हणाले...

मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; आज, उद्या 5 ते 10 टक्के पाणीकपात

महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार?