थोडक्यात
कोल्हापूरमध्ये महायुतीची पहिली संयुक्त सभा होणार
सभेला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असणार
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये महायुतीची पहिली संयुक्त सभा होणार आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर आणि सातारा दौऱ्यावर येणार आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य प्रचार रॅली, सभा सकाळी असणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता सभा कोल्हापुरात महायुतीची सभा आणि प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.