सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा बिटकॉईन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका करत सवाल उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा बिटकॉईन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन भाजचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केले होते. या आरोपावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या की, नाही, नाही, नाही. त्या क्लीपमध्ये माझा आवाज नाही. कोणीही चेक करावं. माझा कोणाशीही संबध नाही. असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही खोटी ऑडिओ क्लिप आहे, मी सायबरला तक्रार केली आहे, असे देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, सुधांशू त्रिवेदी यांनी रात्री सांगितल बाहेर याव. मी रात्रीच बाहेर आले. आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदीजीना विनंती करते की, ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ते चॅनेल, ते म्हणतील त्या कॅमेरासामोर, ते म्हणतील ते शहरात मी येऊन मनमोकळेपणे ते स्वत: कींवा त्यांच्य पक्षातील कोणत्याही व्यक्तीशी मी बसून उत्तरं द्यायला तयार आहे.
काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
‘तुम्ही सर्व बिटकॉईन काढून कॅश का घेत नाही? सध्याच्या किंमती अनुकूल आहेत. निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे आम्हाला मोठा निधी लागणार आहे. चौकशीबद्दल घाबरू नका, आमचं सरकार आल्यानंतर ते हाताळू. फक्त ते पूर्ण करा.’
‘गौरव काय चाललं आहे? तुम्ही कुणीही प्रतिक्रिया देत नाही. माझ्यासोबत खेळ खेळू नका. गुप्ता गायब आहे, मग पैशांचं काय झालं? तो म्हणाला सगळे बिटकॉईन आणि कॅश तुमच्याकडे आहे. मला लगेच फोन कर, आम्हाला पैशांची गरज आहे. निवडणुका सुरू आहेत’
भाजचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विचारलेले पाच प्रश्न
१. या ऑडिओ क्लिपमध्ये बिटकॉईनबाबत करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे की नाही? तो कायदेशीर व्यवहार आहे की बेकायदेशीर?
त्या म्हणाल्या की, नाही, नाही, नाही. त्या क्लीपमध्ये माझा आवाज नाही. कोणीही चेक करावं.
२. तुमचा गौरव मेहता आणि गुप्ता नावाच्या व्यक्तीशी काही संबंध आहे की नाही?कधी संपर्क झाला की नाही?
माझा कोणाशीही संबध नाही
३. अशाप्रकारचा कोणता संवाद गौरव मेहता किंवा गुप्ता नावाच्या व्यक्तीशी झाला की नाही?
४. नुसते ट्विट करून फायदा होणार नाही. हा तुमचा आवाज आहे की नाही हे तुम्हाला सांगावे लागेल.
५. यात बिग पीपल हा शब्द बोलला जात आहे, ती मोठी माणसे कोण आहेत?