suhas kande vs chhagan bhujbal 
विधानसभा निवडणूक 2024

'काका-पुतण्यांनी अडीच हजार कोटींचा घोटाळा केला', सुहास कांदे यांचा भुजबळांवर आरोप

काका-पुतण्यांनी अडीच हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी समीर भुजबळांवर केला आहे. तर आगामी काळात भुजबळ जेलमध्ये असतील असही त्यांनी म्हटलं आहे. कांदेंच्या आरोपांना कोर्टात उत्तर देणार असल्याचा पलटवार छगन भुजबळांनी केला आहे.

Published by : Team Lokshahi

काका-पुतण्यांनी अडीच हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी समीर भुजबळांवर केला आहे. तर आगामी काळात भुजबळ जेलमध्ये असतील असही त्यांनी म्हटलं आहे. कांदेंच्या आरोपांना कोर्टात उत्तर देणार असल्याचा पलटवार छगन भुजबळांनी केला आहे. आम्ही जमिनी लाटत नाही आणि खोट्या केसेस टाकत नसल्याचं म्हणत सुहास कांदेंना भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

कोण आहेत सुहास कांदे?

नांदगाव मतदारसंघातून आमदार झालेले सुहास कांदे शिवसेनेत असले तरीही ते याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. एकेकाळी छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र नंतर जेव्हा त्यांचा दबदबा वाढला तेव्हा छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात वैर निर्माण झालं.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत नांदगावातून सुहास कांदे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर 2022 साली एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं त्या बंडात सुहास कांदेही सहभागी झाले. यामुळे घडलं असं की एकमेकांशी कट्टर वैर असलेले दोन नेते पुन्हा एकाच सरकारमध्ये आले. ते दोन नेते होते सुहास कांदे आणि दुसरे आहेत छगन भुजबळ. 2019 च्या निवडणुकीत सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांचा पराभव केला.

Rahul Gandhi नाराज? जागावाटपाबाबत काय म्हटले राहुल गांधी?

देवेंद्र फडणवीस सोडवणार मुंबईतील जागांचा पेच?

लहान मुलांचे कान टोचण्याच्या परंपरेमागील नेमक कारण काय? जाणून घ्या...

Rohit Patil VS Sanjay kaka Patil: तासगाव- कवठेमहांकाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ ; रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील लढत

Mns Candidate List 2024: मनसेची चौथी यादी जाहीर, पाच शिलेदार मैदानात