राज्य सरकारने जाहीर केलेल्या एकापेक्षा एक योजनांना विरोध करण्यासाठी विरोधकांकडे ठोस असा उतारा सापडत नसताना त्याच योजना प्रभावीपणे घराघरात पोहोचवण्याचे काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं आणि विरोधकांची चांगलीच डोकेदुखी वाढवली. या सर्व योजना घराघरात पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान श्रीकांत शिंदे यांनी हाती घेतले. दिवसाला स्वतः 25 कुटुंबांना भेट देत सुरू केलेल्या योजनांपैकी प्रमुख 10 योजना त्यांनी घराघरात पोहोचवल्या.
कोणत्या योजना घराघरात पोहचवल्या?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
लेक लाडकी लखपती योजना
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना
मुख्यमंत्री वयोश्री योजना
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना
मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना
कामगार कल्याण योजना
महिला बचत गटासाठी विविध योजना
अशा महायुती सरकारच्या टॉप 10 योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणे, योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत विचारपूस करणे, लाभ मिळाला नसेल तर तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणे, शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगत अभियानाचा मुख्य उद्देश साधत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला पगडा भारी करत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांसमोर पेच निर्माण केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात अधिकचे यश मिळाले असले तरी विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी सोपी नसल्याचे स्पष्ट होत आहे. श्रीकांत शिंदे यांच्या योजना घरोघरी पोहोचवण्याचे हे अभियान पालघर, मुंबई, ठाणे यासोबतच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवले जात आहे. तेव्हा लोकसभा निवडणुकीनंतर काहीसा आत्मविश्वास निर्माण झालेल्या विरोधकांना सरकारला घेरण्यासाठी कमकुवत बाजू सापडतच नाही. सरकारच्या योजनांचा सकारात्मक परिणाम जनतेत झाला तर महायुतीला अर्थातच शिवसेनेला अपेक्षित असे यश महाराष्ट्रात मिळेल यात शंका नाही.