विधानसभा निवडणूक 2024

Shrikant Shinde: महाराष्ट्रात विकासाची नवी दिशा देणारे सरकार आणण्यासाठी; डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले...

भिवंडी पूर्व विधानसभेचे महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की,

Published by : Team Lokshahi

भिवंडी पूर्व विधानसभेचे महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार नरेश मस्के शिवसेना नेते प्रकाश पाटील उपनेते माजी आमदार रुपेश म्हात्रे यासोबतच शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ,आरपीआय आठवले गट ,आरपीआय एकतावादी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख रितेश जाधव व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

यादरम्यान डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा जोरदार प्रचार सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी पूर्व विधानसभेची निवडणूक आम्ही लढतोय. या ठिकाणी उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेला मेळाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वा खाली सव्वा दोन वर्ष केलेल्या विकासात्मक कार्या वर जनतेचा विश्वास आहे त्या जीवावर

आम्हाला विजय नक्कीच मिळेल हा विश्वास आहे.महायुतीच्या विकास कार्यामुळे सगळी कडे चांगलं वातावरण आहे आजही शिवसेने मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश करत आहेत. रुपेश म्हात्रे यांनी मोठ्या मनाने उमेदवारी मागे घेतली,अनेक कार्यकर्ते प्रवेश करतात त्यामुळे ही मोठी ताकद आमच्या पाठीशी उभे राहिल्याने संतोष शेट्टी विधानसभेत नक्कीच पोहोचतील. त्यांनी भिवंडी शहरात नगरसेवक म्हणून चांगलं काम केलेलं आहे त्यावर येथील जनता विश्वास ठेवेल. सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये चांगले समन्वय आहे. चांगल्या वातावरणात प्रचार होत असल्याने आम्ही मोठ्या मताधिक्याने विजय होऊ असा विश्वास डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला

Mahim Vidhan Sabha | निकालापूर्वीच Uddhav Thackeray यांचा भाजपला धक्का

BJP Meeting | सागर बंगल्यावर खलबत सुरु; भाजपची पुढची रणनीती काय? | Lokshahi Marathi

काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 00 / 288

महायुती - 00 / 288