केदार दिघे यांना पाचपाखाडीमधून उमेदवारी देण्याची माहिती आहे. केदार दिघे एकनाथ शिंदेच्या विरोधात निवडणूक लढण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून केदार दिघे यांना उमेदवारीची शक्यता आहे. तर पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर झाली आणि त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील पाचपाखाडीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतणार आहेत.
मात्र त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतून केदार दिघे जे आनंद दिघेंचे पुतणे आहेत आणि एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंना आपले गुरु मानतात आणि त्यांच्याच तालमीमध्ये घडलेले मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात आता आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे हे निवडणुकीच्या रिंगणात शिंदेंच्या विरोधात उतरण्याची शक्यता आहे कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून केदार दिघेंना पाचपाखाडीमधून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.